बागेतील परिस्थितीचा विचारकरून बागायतदारांनी आंबापीक संरक्षण करणे गरजेचे ,कृषी विद्यापीठाचा सल्ला
सध्या मोठ्या प्रमाणावर वातावरणात बदल होत आहे याचा परिणाम आंबा पिकांवरही होत आहे आंबा बागायतदारांनी आंबापालवीवरील तसेच मोहोरावरीलतुडतुडे, फुलकिडे, मिजमाशी वइतर किडींची जिज्ञासू पणाने सखोलमाहिती करून घेणे गरजेचे आहे.खतांचा संतुलित वापर करावा.बागेतील परिस्थितीचा विचार
करून बागायतदारांनी आंबापीक
संरक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा
गरज नसताना कीटकनाशकांचा
अतिवापर होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक
आंबा मोहोर तंत्रज्ञान वापरणे गरजेचे
आहे, असे आवाहन दापोली येथील
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी
विद्यापीठाने आंबा बागायतदार आणि
शेतकऱ्यांना केले आहे.
www.konkantoday.com