नवीन वर्षात ‘मीच आहे माझ्या कोकणचा अॅम्बेसिडर’ असा विचार करून ‘कोकण फर्स्ट’ ही संकल्पना राबविण्याचा संकल्प
देवभूमी असलेल्या कोकणच्या विकासासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. नवीन वर्षात ‘मीच आहे माझ्या कोकणचा अॅम्बेसिडर’ असा विचार करून ‘कोकण फर्स्ट’ ही संकल्पना राबविण्याचा संकल्प ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी केला आहे. त्या माध्यमातून कोकणच्या पर्यटनाकडे जगाचे लक्ष वेधून घेतले जाणार आहे.
लंडन फर्स्ट या उपक्रमातून प्रेरणा घेऊन संजय यादवराव ही चळवळ सुरू करीत आहेत. लंडनमधील माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला की, लंडन किती सुुंदर आहे, सुसंस्कृत आहे याची माहिती तो जगभर देतो आणि लंडनमध्ये प्रत्येकाला निमंत्रित करतो.याच धर्तीवर यापुढे ग्लोबल कोकणचे सर्व कार्यकर्ते ‘कोकण फर्स्ट’ हा लोगो वापरून लोकांना कोकणात निमंत्रित करणार आहेत. त्या माध्यमातून हे कार्यकर्तेच कोकणचे अॅम्बेसिडर होणार आहेत. हेच अॅम्बेसिडर कोकणातील निसर्ग पर्यटनस्थळांची माहिती आणि येथे असलेल्या सुविधांची तसेच येथील संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृतीची माहिती जगाला देतील. नववर्षाच्या निमित्ताने हे नव अभियान सुरू करण्यात आले असून कोरोना संकटाच्या काळानंतर कोकणच लोकांना आकर्षित करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
www.konkantoday.com