कणकवली तालुक्यातील कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर १जानेवारी पासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोरोना स्वॅब कलेक्शन सेंटर १जानेवारी पासून बंद केले आहे.त्यामुळे लोकांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे.कोरोनाच्या तपासणीसाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे. कणकवलीत कोरोना स्वॅब घेणारा कक्ष कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद केले आहे.
स्वॅब कलेक्शन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ न दिल्यामुळे कणकवली येथील स्वॅब कलेक्शन सेंटर १ जानेवारी २०२० पासून बंद ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com