
मिरकरवाडा येथील त्या भूखंडावरील शाळेचे आरक्षण रद्द करून तो भूखंड मत्स्य उद्योगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय
रत्नागिरी शहराजवळील मिरकरवाडा येथील त्या भूखंडावरील शाळेचे आरक्षण रद्द करून तो भूखंड मत्स्य उद्योगासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला
आरक्षित भूखंडालगत रासायनिक उद्योग, बर्फ कारखान असून, परिसरात उघडी गटारे आहेत. शिवाय पहिल्या शाळेपासूनचे अंतर कमी असल्याने शाळेचे आरक्षण ठेवता येणार नाही, याबाबत कार्यालयीन अहवाल प्राप्त असून, जिल्हाधिकाऱ्यांचेही मत असल्याने नगर परिषदेच्या विशेष सभेत त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विशेष सभा झाली.
कोकणनगर येथील कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वसाहतीमधील रेखांकनांतर्गत रस्ते, खुल्या जागा व सुविधा भूखंड नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याबाबत कार्यालयीन अहवालावर निर्णय घेण्याबाबत कालची विशेष सभा बोलावण्यात आली हाेती मिरकरवाडा येथील भूखंडांसाठी नसल्याचे नगराध्यक्ष साळवी सांगितले. मात्र, मिरकरवाडा येथील सुरेशकुमार खाडिलकर यांनी याबाबत नगर परिषदेकडे अर्ज केला असल्याने या अर्जावर निर्णय व्हावा, याकरिता विषय पत्रिकेवर हा विषय घेण्यात आला.
नगरसेवक सुहेल साखरकर यांनी मत्स्य उद्योग व्यवसाय भूखंडावर टाकण्यात आलेले शाळेचे आरक्षण तसेच ठेवावे, असे सांगितले. त्याला शिवसेनेच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला शेवटी बहुमताने उद्योगासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. तेथे रासायनिक कारखाने, बर्फ कारखाने, उघडी गटारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय पहिल्या शाळेपासून हे अंतर कमी आहे. कार्यालयीन अहवालाप्रमाणेच कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत बोलताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी याविषयी बोलताना सांगितले की सोहेल साखळकर व संस्थेच्या अध्यक्षांशी याबाबत चर्चा झाली असून
या विषयांमध्ये कोणत्याही श्रीखंड की भूखंड असा कोणताही विषय नाही असे स्पष्ट केले त्यामुळे कार्यालयीन अहवालाप्रमाणे पुढे जाण्याचे ठरवण्यात आले आहे तर या ठरावाला विरोध करणारे सुहेल साखरकर यांनी या भूखंडावर शाळेचे आरक्षण असल्यामुळे ते शाळेसाठी मिळावे ही मागणी असल्याचे सांगितले या ठिकाणी या परिसरातील संस्थेमार्फत हायस्कूल उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले या ठिकाणी शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची आरोग्यावर परिणाम होईल हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे हा परिसर सर्व मच्छीमारांचा परिसरच आहे या परिसरात सध्या असलेली शाळादेखील तशाच परिस्थितीत आहे या ठिकाणी हायस्कूल झाल्यास या भागातील मच्छिमारांची मुले शिकणार असल्यामुळे हा भुखंड शाळेसाठी राखीव ठेवावा अशी आमची मागणी असल्याचे सांगितले
www.konkantoday.com