
निवळी गणपती पुळे महामार्गावर तरवळ येथे मोटरसायकल अपघातात पेठ वडगाव येथील तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगणे पेठ वडगाव येथून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तरुणाच्या मोटरसायकलला अपघात होऊन त्यामध्ये धनाजी तेवरे राहणार पेठ वडगाव याचा मृत्यू झाला धनाजी हा आपल्या मित्रासह दोन स्वतंत्र मोटरसायकल वरून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी पेठवडगाव येथुन निघाले होते ते शुक्रवारी रात्री निवळी गणपतीपुळे मार्गावरून निघाले असताना तेवरे याच्या मोटरसायकलला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला आपला मित्र धनाजी आला नाही परत मागे फिरून आल्यानंतर त्याच्या मित्राला हा अपघात झाल्याचे दिसले
www.konkantoday.com