
नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जूनमध्ये शाळेची घंटा वाजण्याची शक्यता
कोरोना काळातील चालू शैक्षणिक वर्षात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनच अभ्यास करावा लागणार आहे. आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याविषयी तसेच या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा घेण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने येणाऱया नव्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जूनमध्ये शाळेची घंटा वाजण्याची शक्यता आहे.
पहिल्या सत्रात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा घेण्याविषयी शालेय शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत. बहुसंख्य शाळांनी सहामाही परीक्षेसह पहिली आणि आता दुसरी घटक चाचणी परीक्षांचे आयोजन केले आहे. त्यानुसार शाळेत न जाता विद्यार्थी घरूनच ऑनलाईन पद्धतीने वार्षिक परीक्षाही देतील, अशी शक्यता आहे.
www.konkantoday.com