येत्या नवीन वर्षात मुद्रांक शुल्कात म्हणजे स्टँप ड्युटीत १टक्के वाढ करण्यात येणार
येत्या नवीन वर्षात मुद्रांक शुल्कात म्हणजे स्टँप ड्युटीत १ टक्के वाढ करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात मालमत्ता खरेदी विक्री व्यवसायातील उदासीनतेचं वातावण दूर करण्यासाठी स्टँप ड्युटीमध्ये सवलत देण्यात आली होती.
त्यानुसार मुंबईत ३टक्के आणि राज्यात इतर ठिकाणी दोन टक्के सवलत देण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२०पर्यंत सवलत देण्यात आली होती. जानेवारी २०२१ पासून सध्याच्या सवलतीत एक टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे सध्याच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सदनिका, मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात वाढ झाली.
www.konkantoday.com