
मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, पालघर जिह्यांत थंडीचा कडाका वाढला
वर्षाअखेरीस मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, पालघर जिह्यांत थंडीचा कडाका वाढला आहे. मंगळवारी मुंबईत मोसमातील सर्वात कमी तापमान नोंद झाले. सांताक्रूझमध्ये पाऱयाने १५ अंशांची नीचांकी पातळी गाठली. याचवेळी शहराचे कमाल तापमानही जवळपास ३ अंशांनी घटले. शेजारच्या डहाणूचे तापमान १३ अंशांपर्यंत खाली आले. पाऱयाच्या या घसरणीमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली.
www.konkantoday.com