
मुंबईत उद्या नववर्ष स्वागतासाठी रात्री समुद्र किनारे, चौपाट्यांवर फिरण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
मुंबईत उद्या नववर्ष स्वागतासाठी रात्री समुद्र किनारे, चौपाट्यांवर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईत ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
मात्र हे जमावबंदीचे आदेश आहेत, संचारबंदीचे नाहीत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन रस्त्यांवरून फिरायचे नसून गर्दीदेखील करायची नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. चारचाकी वाहनातही ४ किंवा त्याहून अधिक प्रवासी नसावेत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
www.konkantoday.com