देश -विदेशातून मुंबईत येणाऱया पर्यटकांना आता चित्रपट व टीव्ही मालिकांचे चित्रीकरण बघण्याची संधी
देश -विदेशातून मुंबईत येणाऱया पर्यटकांना आता चित्रपट व टीव्ही मालिकांचे चित्रीकरण बघण्याची आणि आपल्या आवडत्या कलाकारांसोबत गप्पा मारण्याची लवकरच संधी मिळणार आहे. या नव्या योजनांमुळे कोरोनोत्तर काळात राज्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड या कंपनीत करार झाला. या वेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे व अन्य उपस्थित होते.प्रत्यक्ष फिल्म शूटिंग बघण्यास मिळणे ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. यासाठी खास तयार करण्यात आलेल्या बसचाही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या बसमधून पर्यटकांना प्रत्यक्ष चित्रपट, टीव्ही मालिकांचे चित्रीकरण पहायला मिळेल. याशिवाय मुंबईत यापूर्वी चित्रपटांचे जे शूटिंग झाले त्या ठिकाणावर उतरण्यापूर्वी बसमध्ये त्या चित्रपटातल्या त्या स्थळाचा भाग दाखवला जाईल व नंतर प्रत्यक्ष ती जागा दाखवली जाईल. पेडर रोड येथील फिल्म डिव्हिजनच्या फिल्म संग्रहालयाला भेट देण्याचीही संधी मिळेल.
www.konkantoday.com