
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदा सरस प्रदर्शन रद्द, बचत गटांचा हिरमोड
वर्षअखेरीस सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू विघ्नहर्त्याचे मंदिर, समुद्रकिनारपट्टीवर भाविक, पर्यटकांची विक्रमी गर्दी झाली आहे. या सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष केले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रतीवर्षी आयोजित केले जात असलेले महिला बचत गटाचे सरस प्रदर्शन यंदा रद्द करण्यात आले आहे
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कारण पुढे करून यंदा हे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. प्रदर्शन रद्द केल्याने बचतगटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री करणे शक्य होणार नाही.
www.konkantoday.com