
वाघाच्या नखांची तस्करी करणार्या तिघांना गुहागर पोलिसांनी घेतले ताब्यात
गुहागर पोलिसांनी गुहागर तालुक्या तील मुंढर येथे वाघांच्या नखाची तस्करी करताना तिघांना रंगेहात पकडण्यात यश मिळवले ही कारवाई गुहागर पोलिस आणिस्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी पार पडली याप्रकरणी तीनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीसनिरीक्षक अरविंद बोडके करत आहेत.गुहागर तालुक्यातील मुंढर येथे वाघाच्या नखांची तस्करी करण्यासाठी
इसम येणार असल्याची खबरस्थानिक गुन्हे अन्वेषण रत्नागिरी आणिगुहागर पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी तेथे आपली फिल्डिंग लावली व तेथे आलेल्या तीन जणांना पकडण्यातपोलिसांनायशआले.पोलिसांच्या या कारवाईने कोकणात अजूनही वाघांच्या नखांचीतस्करी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे
www.konkantoday.com