मुंबईत थंडीचा कडाका वाढला, मुंबईत आज किमान तापमान१३ अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदविले गेले
मुंबईत थंडीचा कडाका वाढलाय. मुंबईत आज किमान तापमान१३ अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदविण्यात आलंय. काल मुंबईत १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्यामुळं मुंबईत रात्रीपासून गारठा अधिक जाणवू लागलाय. ठाणे, मुंबई, नवी मुंबईत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
दरम्यान, ठाणे, मुंबई, नवी मुंबईत उद्या ३०डिसेंबर रोजीही, सकाळी तापमानात तीव्र घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान १४ ते १५ अंशाच्या आसपास असून ते आणखी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
www.konkantoday.com