भाविकांसाठी श्री करवीर निवासिनी अंबाबाई व अन्य मंदिरातील दर्शनाची वेळ वाढविण्यात आली
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची बैठक समितीच्या मुख्य कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्ष व सर्व समिती सदस्यांच्या वतीने भाविकांसाठी श्री करवीर निवासिनी अंबाबाई, केदारलिंग जोतिबा, दत्त भिक्षालिंग, ओढ्यावरील सिध्दीविनायक, बिनखांबी गणेश मंदिर, त्र्यंबोली या मंदिरातील दर्शन वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता (मंगळवार) पासून दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com