ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जातपडताळणीसाठी उमेदवारांची जातपडताळणी कार्यालयासमोर झुंबड
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक एकाचवेळेत होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीला प्रवर्गातून उभ्याराहणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज
केल्याची पावती बंधनकारक असल्याने सोमवारीपडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबडउडाली होती. सोमवारपर्यंत १ हजार ३५० उमेदवारांनी
पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागासवर्गातून उभे राहणाऱ्या
उमेदवारांची जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन होणार आहे.
त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्या साठी इच्छुक उमेदवारांचीलगबग सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मागास प्रवर्गासाठीराखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्व
मागासवर्गीय उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून जातप्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. जात प्रमाणपत्र पडताळणीप्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन झाली आहे.
www.konkantoday.com