मिरकरवाडा येथील एका मच्छीमारी नौकेला सुमारे ६ टन बंपर सरंगा मिळाला
नैसर्गिक संकटांमुळे यंदाचा मच्छीमारी हंगाम अडचणीत आलाआहे. ३१ डिसेंबरपासून पर्ससिननेट बंदीला सुरवात होणार आहे.गेले काही दिवस मतलई वारे वाहत असून थंडीचा कडाकाहीवाढलेला आहे. वेगवान वाऱ्यामुळे पाण्यातील प्रवाह पुढे सरकतआहेत. परिणामी मासेही रत्नागिरीच्या किनारी भागातून पुढे
श्रीवर्धनच्या दिशेने सरकु लागले आहेत. जयगडकिनारपट्टीपासून सुमारे २८ वाव खोल समुद्रात मिरकरवाडायेथील एका मच्छीमारी नौकेला सुमारे ६ टन बंपर सरगा
मिळाला. सध्या सरंग्याला बाजारात ३५०ते ४०० रुपये किलो दर
मिळत आहे. सध्या परप्रांतीय नौकांचा धुडगूस सुरुअसल्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या हाती काहीच लागत नाही.
www.konkantoday.com