
दामले विद्यालयातील शिक्षिका सौ. भावना प्रवीण मोटघरे – वाघेला यासोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात
रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामलेविद्यालयातील शिक्षिका सौ. भावना प्रवीण मोटघरे – वाघेला यासोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात
दिसणार आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत हॉट
सीटवर त्या विराजमान होऊन रत्नागिरीची मान उंचावणार
आहेत.शिक्षिका वाघेला या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमासाठी पात्र
ठरल्या होत्या. कार्यक्रमात हॉट सीटवर बसण्यासाठी घेण्यात
येणाऱ्या फास्टर फिंगर फर्स्ट यातून त्या विजेत्या होऊन आता
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत हॉट सीटवरपाहण्याची संधी अनुभवता येईल. येत्या ३० व ३१ डिसेंबर२०२० ला रात्री ९ ते १०.३० वाजता सोनी टीव्ही वरीलएपिसोडमध्ये दिसणारआहेत.
www.konkantoday.com