गुलाबी थंडीच्या धुक्यात नव्हे तर भरदुपारी पसरलेल्या धुरात रत्नागिरीची हरवली वाट

सध्या सर्वत्र गुलाबी थंडीची लाट आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी धुके पसरलेले दिसते मात्र रत्नागिरी शहरात आज सायंकाळी चार वाजता जे के फाईल्स च्या दरम्यान असेच काहीसे दृश्य नागरिकांना पाहायला मिळाले या दृश्यात पाहिले तर दाट धुक्यामुळे रस्ता हरवल्याचे दिसत आहे मात्र प्रत्यक्षात सायंकाळी चार वाजता हे धुके नसून धूर असल्याचे स्पष्ट झाले आहे आजूबाजूच्या कारखान्यातील किंवा अन्य ठिकाणावरून कचरा जाळल्याने या परिसरात सायंकाळी चार वाजता एवढा धूर सर्वत्र पसरला होता की समोरून येणारी वाहनेही स्पष्ट दिसत नव्हती मात्र संबंधित यंत्रणेला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट होत आहे हा धुर नेमका कोठून आला हा आता संशोधनाचा विषय आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button