
पुतळे जाळण्याचे नाटक करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज -काँग्रेसचे नेते व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड
आपण रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलनात कायमच स्थानिक जनतेसोबत राहिलेलो असताना विधानसभा निवडणूकीत आपणा विरोधात शिवसेनेचे उमेदवार आ. राजन साळवी यांना मतदान करा असे सांगणारी मंडळी आता उसने औसान आणून आ. साळवीं विरोधात आंदोलन करून पुतळे जाळण्याची नौटकी करत आहेत असा घणाघात काँग्रेसचे नेते व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी केला आहे. अशा प्रकारे पुतळे जाळण्याचे नाटक करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा टोलाही लाड यांनी लगावला आहे.
www.konkantoday.com