
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपापली सत्ता टिकविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात पक्षांची मोर्चेबांधणी
रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालीआहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व असले तरीही भाजपाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी आक्रमक व्युहरचना लावली आहे. अंतर्गत मतभेद कायम असले तरी भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. आवश्यकता भासल्यास गाव पॅनलबरोबर तडजोड करून निवडणुका लढण्याची भूमिका भाजपा पदाधिकार्यांनी जाहीर केली आहे. कोतवडे, राई, चाफे, डोर्ले, चांदेराई ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता असून ओरी ग्रामपंचायतीत गाव विकास पॅनेलचे वर्चस्व आहे. उर्वरित ४४ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेसह त्यांच्या पाठिंब्याने सत्तेत असलेल्या गाव पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
www.konkantoday.com