
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत जाकादेवी येथील तरुणाची एक लाखांची ऑनलाइन फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथे गोताड वाडी येथे राहणारा अमोल गोताड याला बजाज कंपनीमधून पर्सनल लोन मंजूर करून देतो असे सांगून त्याची एक लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अंशुमन शाहू यांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांत तकार तक्रार दाखल करण्यात आली आहे
खालगाव जाकादेवी येथे राहणारा अमोल याच्या मोबाईलवर आरोपी अंशुमन याने फोन करून तुला बजाज कंपनीतून पर्सनल लोन मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले एकूण एक लाख आठ हजार रुपये त्याने ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर करायला लावले प्रत्यक्षात अमोल याला कोणतेही लोन मंजूर करून दिले नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अमोल याने आरोपीच्या विरोधात ग्रामीण पोलिसस्थानकात तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com