
माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर हल्ल्याचे प्रकार घडत असतानाच त्यांचेकडून संरक्षणासाठी अर्ज नाही
राज्यात अनेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्ते यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात अशा प्रकारे माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून वैयक्तिक सुरक्षेसाठी पोलिसांकडून अर्ज केला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.माहिती अधिकार २००५ केंद्र शासनाकडून लागू करण्यात आल्यानंतर शासनाकडील माहिती जाणून घेण्यासंबंधी अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून माहिती अधिकार कार्यकर्ते देखील तयार होवू लागले. शासकीय माहितीमधून काही गैरप्रकार देखील पुढे येत असल्याने अनेकांसाठी ही माहिती अडचणीची होवू लागली आहे. www.konkantoday.com