मागील दहा दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात लंडन वरून १० जण आले
रत्नागिरी जिल्ह्यात लंडन वरून १० जण आल्याचीमाहितीआरोग्ययंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असूनत्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळप्रशासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
लंडन येथून आलेल्या या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने
घेतला असून यापैकी ७जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर ३जण संगमेश्वर तालुक्यातील आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ७जणां पैकीपाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्याकारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथेविलगिकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com