दूषित, रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले,पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण मंडळाच्या अधिकार्याला कार्यकर्त्यांनी बांधून ठेवले
दूषित, रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. तरीही नदी प्रदूषित करत असलेल्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण विभाग काहीही कारवाई करीत नाही. याचा जाब विचारत पाहणी करण्यास आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी सचिन हरभट यांना स्वाभिमानीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दीड तास बांधून घालून संताप व्यक्त केला. यावेळी अधिकारी व कार्यकर्त्यांत चांगलीच झटापट झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेे. प्रदूषण करणार्या घटकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संतप्त कार्यकर्ते शांत झाले.
www.konkantoday.com