
काेकणासाठी व राज्यासाठीःमंदिरे आणि लेण्यांसाठी १०१ कोटी मंजूर समविचारीने मानले शासनाचे आभार
कोकणातील रत्नागिरी जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या विलोभनीय आहे.ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिध्द आहे.परशुराम भूमी म्हणून जगमान्य आहे.कोकणातील पर्यटनवाढीच्या दृष्टीने शासनाने पुरातन मंदिरे,पांडवकालीन लेणी,यांचे तातडीने सुशोभिकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने येथील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे दि.१६/११/२०२० रोजी केली होती.
केवळ निवेदन वा विषय मांडून उपयोगी नसते तर त्यातील मुद्दा महत्त्वाचा असल्यास शासन त्याची दखल घेते.याबाबत या विषयाचे महत्त्व पटल्याने शासनाने या विषयाकडे केवळ कोकणापुरते न पहाता राज्यातील सर्वच मंदिरे,लेण्या यांना १०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन पर्यटन स्थळे विकसित करण्याचा मार्ग अवलंबिलेला आहे.आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याने समविचारीच्या वतीने स्वतंत्र ई-मेल द्वारे मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्तविण्यात आल्याचे समविचारीचे बाबासाहेब ढोल्ये यांनी सांगितले.
याबाबत समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य महिला समन्वयक राधिका जोगळेकर,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,महिलाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी युवा प्रमुख निलेश आखाडे,यांनी सविस्तर निवेदन दिले होते.सदर निवेदनात,देशांतील अनेक महात्म्ये या भूमीत जन्मले.पुरातन मंदिरांनी आपले महात्म्य आणि देवत्व सिद्ध केले आहे.विलोभनीय नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या या जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरे आणि आणि पांडवकालीन लेणी शासनस्तरावर दुर्लक्षित असल्याचे नमूद करुन पुरातन आणि पर्यटन विभाग निधीअभावी लक्ष देत नसल्याचे नमूद केले होते.
अ,ब,क,ड, विभागवार ही पर्यटनस्थळे विकसित करण्याची प्रयोग निधी अभावी लालफितीत गुंडाळला गेल्याचे नमूद करुन लोकप्रतिनिधी पर्यटन विकास करुन रोजगार देण्याचे सांगून कोकणातील जनतेचे मनोरंजन करीत असल्याचे नमूद करुन गोरगरिब तरुणांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पर्यटन कोकण अंतर्भाव व्हावा यासाठी आपण स्वतः याविषयी लक्ष घालावे अशी विनंती समविचारीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली होती.त्याला यश आले असून आजच्या या निर्णयाचे स्वागत करुन समविचारीने शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
www.konkantoday.com