दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरणाची गळती आता थांबणार,२ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर
दापोली तालुक्यातील हर्णे येथील खेम धरणाची गळती आता थांबणार असून या कामासाठी शासनाकडून २ कोटी ४५ लाखांचा निधी प्राप्त झाला असून धरणाच्या कामाला तातडीने सुरूवात देखील करण्यात आली आहे.
हर्णे गावाला पाणी पुरवठा करणार्या खेम धरणाच्या बाबतीत अनेक समस्या उदभवल्या होत्या. त्यात धरणाला गळती झाल्यामुळे आता धरण फुटेल की काय याची भीती परिसरातील ग्रामस्थांना वाटत होती. स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने ही गळती थांबवावी यासाठी नेत्यांसह शासनाकडे साकडे घातले. शासनाकडून या मागणीला मंजुरी मिळाली आहे.
www.konkantoday.com