पोयनार अलाटीवाडी शेवरोबा मंदीर मार्ग विद्युतीकरण कामाचा शुभारंभ
खेड : तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील पोयनार अलाटीवाडी येथील शेवरोबा मंदीर मार्गाच्या विद्युतीकरण कामाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. गेली अनेक वर्षे अंधारात असलेला हा मार्ग आता लवकरच उजाळून निघणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
खेड दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मतदार संघात विकासकामांचा धडाका लावला आहे. गेल्या आठवड्यात आयनी खोतवाडी येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करून येथील ग्रामस्थांची ४० वर्षाची दळण-वळणाची प्रतिक्षा संपुष्टात आणली होती. आता पोयनार आलाटी वाडीतील शेवरोबा मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन वीजपोल उभे करून या रस्त्याचे विद्युतीकरण केल्याने शेवरोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अंधारमय मार्ग उजाळून टाकला आहे.
मंदीर रस्त्याच्या विद्युतीकरण उद्धाटनप्रसंगी बोलतान योगेश कदम म्हणाले, गेली अनेक वर्षे या जागृत देवस्थान मंदीराकडे जाणारा मार्ग अंधारमय होता. आता माझ्या हस्ते या मार्गाचे विद्युतीकरण झाल्याने हा मार्ग भाविकांसाठी प्रकाशमय झाला आहे. हे काम माझ्या हस्ते व्हावे हे मी माझे भाग्य समजतो. मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी शेवरोबा मला नक्कीच बळ देईल असे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सभापती विजय कदम, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, विभाग प्रमुख संदीप कांबळे, दत्तात्रय विचारे, सुनील महाडिक आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com