कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटल यांच्याकडील माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू
डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. सदरची लस पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांना पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटल यांच्याकडील माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नाव, पत्ता, वय पदनाम, मोबाईल नंबर, आधारकार्ड क्रमांक, ओळखपत्राची झेरॉक्स प्रत यासह जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या cs_ratnagiri@rediffmail.com या ईमेलवर अथवा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तात्काळ पाठविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने एका पत्रकाद्वारे केले आहे.
www.konkantoday.com