
नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केली
नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने नवी नियमावली जारी केलीय. गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाही. साई भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.
www.konkantoday.com