
वाकवली कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरातून सुमारे 2 लाख 84 हजारांचा ऐवज लांबवला, दागिन्यांवर डल्ला
दापोली : वाकवली कोंडवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरातून सुमारे 2 लाख 84 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. 8 डिसेंबर रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकवली कोंडवाडी येथील प्रमोद सुभाष आम्रे (31) हे दि. 28 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामावर जाण्यापूर्वी त्यांनी आपले घर कुलूपबंद करून चावी घरालगत असणार्या सिमेंटच्या चौकटीमध्ये रुमालात गुंडाळून ठेवली होती. चोरट्याने या चावीने दरवाजा उघडून आतील देव्हार्यातील कपाटाची चावी घेऊन बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किमतीचे सोन्याची चेन, 20 हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची दुसरी सोन्याची चैन असा सुमारे दोन लाख 84 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. घटनेची फिर्याद आंब्रे यांनी दि.29 डिसेंबर 2022 रोजी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे हे करीत आहेत.