रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे सुसज्ज व अत्याधुनिक मॅटर्नीटी, जनरल हाॅस्पिटल बनविण्याचा मानस
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे सुसज्ज व अत्याधुनिक पध्दतीने मॅटर्नीटी, जनरल हाॅस्पिटल बनविण्याच्या दृष्टीने मुस्लिम समाजाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हाॅस्पिटल बनविण्यासाठी रत्नागिरी मधील मुस्लिम समुदायाचे लोक एकत्र येऊन विचारविनिमय करून यासंदर्भात भविष्यातील योजना तयार करण्यात आली. उद्यमनगर येथील धामस्कर यांच्या निवासस्थानी सर्व मुस्लिम समुदायानी एकत्र येऊन हाॅस्पिटल बांधण्याच्या विचारावर एकमताने घेण्यात आले. यावेळी हाॅस्पिटलची सर्व माहिती मौलाना अब्दुल शकुर साहेब व मंन्सुर काझी यांनी सांगितली. हे हाॅस्पिटल चार एकर मध्ये बनविण्यात येणार असून प्रथम १२ खाटांचे असेल तर नंतर त्याचा ११० खाटांमध्ये विस्तार करण्याचा विचार करण्यात आला. सभेची सुरुवात कुराण पठाण करुन करण्यात आली व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर असेही आवाहन करण्यात आले की आपल्या परीने या उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे. हा उपक्रम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी दुवा करण्यात आली. या वेळी सुहेल मुकादम, हनीफ मुल्ला, अझीम होडेकर, शिराज नाखवा, शफी काझी, मुफ्ती तौफीक सांरग, बशिरभाई मुर्तुझा, एजाज खान, हरीस शेकासन, मुद्दसर मुकादम, अक्रम नाखवा, मौसीन काझी, अनीस काझी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com