कोरोना व्हायरसनं सर्वत्र कहर केलेला असतानाच महाराष्ट्रातून मात्र एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. जवळपास मागील दीड महिन्यांची आकडेवारी पाहता राज्यातील कोरोना परिस्थिती हळुहळू सुधारत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सातत्यानं वाढणारे कोरोनारुग्ण आणि नियमांचं उल्लंघन करणारे अनेक नागरिक यांनी शासनाची डोकेदुखी वाढवलेली असतानाच आता मात्र हे चित्र बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सातत्यानं वाढणारा कोरोना बाधितांचा आकडाही आता कमी होत आहे शिवाय कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं म्हणावं लागेल.
www.konkantoday.com