
रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना खाली पडून तरुण गंभीररित्या जखमी.
खेड स्थानकात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये चढत असताना खाली पडून तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३०च्या सुमारास येथील स्थानकात घडली. चंदन शांताराम जाधव (रा. पुरे-खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. उपचारासाठी तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.गावी गणेशोत्सवासाठी आलेले चंदन जाधव हा मुंबईला स्थानकात शनिवारी सकाळी आला होता. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर येथील स्थानकात आली असता गाडीत चढताना तो खाली पडला. यात त्याच्या पाठीला गंभीर दुखापती झाल्या