
राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा
राजापूर तालुक्यातील माडबन समुद्रकिनारी हिरव्या रंगाच्या लाटा पाहावयास मिळत आहेत. परिसरातील समुद्राचे नीळे पाणी अचानक हिरवट रंगाचे झाल्याने स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अरबी समुद्राचा काही भाग हा माडबन गाव किनार्याला लागून आहे. समुद्रात फेसळणार्या लाटा अचानक हिरव्या रंगाच्या दिसत असल्याने मच्छीमारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी, देवगड समुद्रकिनार्यांसह सध्या बर्याच ठिकाणी चकाकणार्या नीळ्या लाटा दिसताहेत. या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांचीही तेथे गर्दी होत आहे.
www.konkantoday.com




