
तोंड उघडायला लावू नका. तुमची कुंडली माझ्या डायरीत लिहलेली आहे – चिपळूणातील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना माजी खासदार नीलेश राणे यांचा इशारा
माझ्या पाकिटावर त्यांचे घर चालायचे तेच आज भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तोंड उघडायला लावू नका. तुमची कुंडली माझ्या डायरीत लिहलेली आहे. असा इशारा भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी चिपळूणातील महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना दिला.
येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात राणे यांनी भाजपला सोडून गेलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर टीका केली.भाजपबरोबर राहतील म्हणून ज्यांच्यावर मी खर्च केला तेच आज भाजपला सोडून गेलेत. माझी गुंतवणूक बुडाल्याचा आता मला पश्चाताप होतोय. २०१९ पर्यंत भाजप आणि नगराध्यक्षा सुरेखा खेराडे त्यांना चांगल्या वाटत होत्या. महाविकास आघाडी झाल्यानंतर भाजप आणि खेराडे वाईट झाल्या. कारण पालिकेत यांना मलिदा मिळाला नाही काही नगरसेवक भाजपपासून लांब गेले आहेत. पुढील निवडणुकीत त्यांना जनता पालिकेतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
www.konkantoday.com