
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद
कोरोनामुळे तीन महिने लांबणीवर पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमखास संधी असल्याने विद्यार्थ्यांचा याकडे कल वाढला आहे.
जिल्ह्यात एकूण १० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत १ हजार २०० एवढी प्रवेश क्षमता आहे; मात्र या जागांसाठी आता २ हजार ५००एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक व रत्नागिरी तालुक्यात महिलांसाठी स्वतंत्र एक मिळून १० प्रशिक्षण केंद्र आहेत.
www.konkantoday.com