हयातीचा दाखला सादर करण्यास २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापिठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांना हयातीचा दाखला सादर करण्यास २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे शासनाच्या परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि. १ नोव्हेंबर पासून ३० नोव्हेंबर पर्यंत निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकाऱ्यास सादर करावा लागतो. सदर हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत संबंधित कोषागारात सादर केला जातो.
या वर्षात कोविड-19 मुळे हयातीचा दाखला सादर करण्यासाठी प्रथम ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र शासनाच्या धर्तीवर ही मुदत २८फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button