
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे-पडेल मार्गावरील वाडातर पुलावरून महिलेला खाडीपात्रात ढकलण्याचा प्रकार
देवगड (सिंधुदुर्ग) येथे एका परप्रांतीय महिलेला जामसंडे-पडेल मार्गावरील वाडातर पुलावरून खाडीपात्रात ढकलण्याचा प्रकार काल घडला. सुदैवाने पाण्यात पडल्यावर पीडित महिलेने आरडाओरड केल्यावर स्थानिकांनी तिचे प्राण वाचविले. ही घटना काल घडली. प्रेम प्रकरणातील कुरबुरीतून असा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. संशयिताला पोलिसांनी कणकवली येथून ताब्यात घेतले. तुकाराम ऊर्फ राजू दत्ताराम पांगम ( कणकवली) असे त्याचे नाव आहे.
www.konkantoday.com