
आयएमएच्या संपाविरोधात राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी डॉक्टरांच्या आयुष कृती समितीने दंड थोपटले
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने (सीसीआयएम) शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित केले. या रात्रपत्राला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने ११ डिसेंबरला देशभरात वैद्यकीय संपाचे हत्यार उपसले आहे. आयएमएच्या संपाविरोधात राज्यातील आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी डॉक्टरांच्या आयुष कृती समितीने दंड थोपटले आहेत. ११ डिसेंबरला राज्यातील दीड लाख आयुष डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
सीसीआयएमने जाहीर केलेल्या राजपत्राविरोधात आयएमएकडून ९ डिसेंबरला महाराष्ट्रात आंदोलन केले होते. मात्र ११ डिसेंबरला देशभरात व्यापक स्वरुपात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com