सचिन गायकवाड यांची मनसेच्या उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्षपदी निवड
दापोलीः- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक व मनविसे उपजिल्हाध्यक्ष श्री.सचिन गायकवाड यांची मनसेच्या उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
मनसेचे पक्षप्रमुख श्री.राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सचिन गायकवाड यांची उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ही निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री.गायकवाड म्हणाले की, पक्षप्रमुखांना अभिप्रेत असलेले काम आपण आपल्या कार्यक्षेत्रात करणार असून आगामी काळात दापोलीमध्ये मनसेची ताकद निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असणार आहोत. श्री.गायकवाड यांच्या निवडीचे मनसेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
www.konkantoday.com