
नाणारमध्ये प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प विदर्भात नेण्याच्या हालचाली सुरू
नाणारमध्ये प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प विदर्भात नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. नागपूर किंवा गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (वेद) या संस्थेने तयार केल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवसेनेच्या विरोधामुळे प्रकल्प वादात अडकला. म्हणून तो विदर्भात नेण्यासाठी प्रयत्न करू, असे विधान यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ते राजकीय असल्याची चर्चा होती. मात्र, आता ‘वेद’ने या प्रकल्पाविषयी अहवाल केल्याने त्या राजकीय चर्चेस पुष्टी मिळालीआहे
www.konkantoday.com