कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी ‘समृद्ध कोकण महामार्ग अभियानास’ प्रारंभ

  कोकणात दर्जेदार कोकण हायवे हा आमचा अधिकार :संजय यादवराव

दहा वर्षे रेंगाळलेल्या कोकणातील महामार्गाच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी अभियानास ७ डिसेंबर पासून प्रारंभ करण्यात आला. सध्या सुरु असलेल्या कामाची गती आणि दर्जा तपासण्यासाठी कोकण वासियांच्या समितीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाचा अभ्यासदौरा सुरु केला आहे.’ कोकणात दर्जेदार कोकण हायवे तातडीने पूर्ण होणे हा आमचा अधिकार आहे,असे कोकण भूमी प्रतिष्ठांनचे अध्यक्ष आणि’समृद्ध कोकण महामार्ग अभियान’चे प्रणेते संजय यादवराव यांनी सांगितले.
कोकण मधील महामार्ग म्हणजे खड्डे महामार्ग असून यावर गेल्या दहा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या हजारो कोकणी बांधवांना श्रद्धांजली देऊन कोकण हायवे समन्वय समितीच्या ‘समृद्ध कोकण महामार्ग अभियान’ या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली.राज्यातील इतर महामार्गाच्या कामांना गती मिळाली असून कोकणावर अन्याय होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोकणात आपल्या गावात जाणारे, गणपती आणि अन्य उत्सवांच्या निमित्त जाणारे हजारो कोकणी बांधव आजपर्यंत या रस्त्यावर मृत्युमुखी पडले.पर्यटन आणि इतर व्यवसायांना उतरती कळा लागण्यास हा रेंगाळलेला महामार्ग आहे.
या आपल्या बांधवांना कोकण महामार्गावर समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. आणि उत्कृष्ट दर्जाच्या आणि देशातील सुंदर समृद्ध कोकण महामार्गासाठी सातत्यपूर्ण अभियानाचा संकल्प केला.
देवभूमी कोकणात दर्जेदार कोकण हायवे हा आमचा अधिकार आहे, आणि त्याचे अभियान आता सुरु झाले. असंख्य समस्या ओपन हायवेवर आहेत , याचा संपूर्ण माहितीचे संकलन कोकण हायवे समन्वय समिती करणार आहे
पाऊस जेवढा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पडतो एवढाच पाऊस कोकण हायवेवर पडतो मग दरवर्षी कोकण महामार्गावर 2 – 4 फुटाचे खड्डे कसे काय पडतात? सहा महिने खड्डे रस्ता आणि मग सहा महिने चांगला रस्ता असे किती वर्ष चालणार ? असा सवाल संजय यादवराव यांनी केला.
पळस्पे ते पोलादपूर या पहिल्या टप्प्याची पाहणी आणि अभ्यास समिती सदस्यांनी केला. सर्व टप्प्यांच्या अभ्यासानंतर पुढील कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. कोकण वासियांनी सोशल मीडिया कॅम्पेन सुरू करावी , एक व्यापक लोकचळवळ आणि दबावगटनिर्माण करावा असेही आवाहन संजय यादवराव आणि समिती सदस्यांनी केले आहे.
यशवंत पंडित,एड ओवेस पेचकर,विकास शेट्ये,विलास नाईक ,एड मंगेश नेने ,संतोष ठाकूर,सुरेश म्हात्रे,निलेश म्हात्रे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button