
मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी
मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने आज (7 जून) सकाळपासूनच जोर धरला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.