
मुंबई चुनाभट्टी येथून रत्नागिरीत गणपतीपुळे येथे आलेल्या क्वालिस कारअपघातात दोन जणांचा बळी गेला
मुंबई – गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे ट्रक आणि क्वालिस कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात क्वालिसमधील दोन जण जागीच ठार झाले तर ६ जण जखमी आहेत. यातील क्वालिस मधील सर्वजण चुनाभट्टी येथून चिपळूण येथे लग्नासाठी आले होते ते पुढे गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. परतीच्या प्रवासात हा भीषण अपघात झाला.क्वालिस गाडीतील सर्वजण मुंबईतील चुनाभट्टी येथील रहिवाशीती मिळाली आहेतएकता दिलीप पिंपळकर (वय २२ रा. चुनाभट्टी,मुंबई ) मयूर संजय धामनस्कर (वय३२,रा. चुनाभट्टी, मुंबई ) अशी मृतांची नावे आहेत तर क्वालिस गाडीतील इतर स्वप्नील जगनाथ टाकळे (वय २१,रा. चुनाभट्टी), दीक्षा संतोष ताम्हणकर (वय २३), तनिष्का प्रकाश रसाळ (वय १२), पूजा महेश धामनस्कर (वय २८), चेतन सुधाकर सावंत (वय २१), चालक अमोल नारायण यादव (वय ३२, सर्व रा. चुनाभट्टी, मुंबई) हे सर्व जखमी आहेत. अमोल यादव गंभीर जखमी असून अन्य सर्व जण किरकोळ जखमी आहेत.
www.konkantoday.com