कोरोना काळात काम केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी सुरु
रत्नागिरीः शासनाने कोरोना महामारीच्या काळात कमी कालावधीसाठी आरोग्य विभागात विविध सवर्गाची पदे भरली आणि गरज संपताच या कर्मचाऱ्यांना कमी केले.
राज्यातील आरोग्य विभागात सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत.सगळीकडे कोरोना भीतीचे सावट असताना या कर्मचाऱ्यांनी जीवाचा विचार न करता काम केले असे असूनही त्यांना कमी करणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.या विरोधात महाराष्ट्र समविचारी मंचने राज्यभर आंदोलनाची हाक दिली असून त्याची सुरवात येत्या १४ डिसेंबरला एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाने रत्नागिरी येथून होणार आहे तरी राज्यातीलशासकीय,निमशासकीय,खाजगी आस्थापनामध्ये ज्या ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले अशांनी विनाशुल्क 9552 340 340 या नंबरवर आपली नावे नोंदवावीत असे आवाहन समविचारी मंचचे राज्य युवा प्रमुख अँड. निलेश आखाडे. यांनी केले आहे.
www.konkantoday.com