पश्चिम घाटातील ८ तर विदर्भातील दोन अशा १० नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता
राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील ८ तर विदर्भातील दोन अशा १० नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.
याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्य़ातील कन्हाळगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य घोषित करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र २६९ चौरस किलोमीटर आहे.
आधीचे सहा आणि नवीन घोषित झालेले तिलारी असे मिळून राज्यात सध्या ७ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. त्यात आता कोल्हापूर जिल्ह्य़ातील ५, सिंधुदुर्गातील एक, साताऱ्यातील २ तर विदर्भातील २ अशा आणखी १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची भर पडली आहे.
www.konkantoday.com