
चिपळूण शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसीतील नऊ कामगारांना डेंग्युची लागण?
चिपळूण शहरालगतच्या खेर्डी एमआयडीसीतील नऊ कामगारांना डेंग्युची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी या परिसरात तत्काळ सर्वेक्षण व धूर फवारणीच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. कामथे उपजिल्हा रूग्णालयात या रूग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती ठिक असल्याचे समजते. www.konkantoday.com