कोट येथील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह नदीत आढळला

लांजा : गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील कोट नारकरवाडी येथील संतोष झिलू नारकर (40) यांचा मृतदेह शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी कोट शेणकोंड येथील बेनी नदीपात्रात आढळून आला आहे. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे घरातून निघून गेले होते. ते बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी संध्या नारकर यांनी 7 नोव्हेंबर रोजी रात्री लांजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर कोट ग्रामस्थ त्यांचा सर्वत्र शोध घेत होते. अखेर त्यांचा मृतदेहत आढळून आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button