
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा काल निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दिल्लीत या बैठकीच्या फेऱ्या पार पडल्या मात्र यातून ठोस असा काहीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना गुरुवारी म्हणजेच ३ डिसेंबरला पुन्हा एकदा चर्चेसाठी सरकारने बोलावलं आहे. पुढची बैठक गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.
www.konkantoday.com