मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता
मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या १५० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे.
बसमधून प्रवासी भरभरुन जात होते. शिवाय दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर म्हणजेच १५नोव्हेंबरपासून मास टेस्टिंग मोहीम हाती घेतली होती. ज्या लोकांचा गर्दीशी सातत्याने संपर्क येतो, त्यांची टेस्टिंग या मोहिमेअंतर्गत करण्यात आली. यामध्ये दुकानदार, फेरीवाले, वेगवेगळ्या ठिकाणचे व्यावसायिक, बाजारातील विक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यात आली.
www.konkantoday.com